- December 4, 2022
- No Comment
मुळशीत खुनी हल्ल्यानंतर फरार असताना इंस्टाग्राम वर दहशत माजवणारा गुन्हेगार जेरबंद
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भुगाव येथे दोन महिन्यांपूर्वी एका व्यावसायिकावर गुन्हेगारी टोळीतील अभिषेक काळवीट व इतर साथीदारांनी हल्ला केला होता. हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाले होते. अभिषेक दत्तात्रय काळवीट वय वर्ष २१ राहणार भुगाव तालुका मुळशी जिल्हा पुणे हा फरार असतानाही instagram वर हातात कोयता घेतलेले फोटो टाकून दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होता. सदर आरोपी मिळून येत नसल्याने त्यास शोधणेकामी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते व त्यांचे पथकास आदेश दिले होते. अभिषेक काळवीट हा मावळ परिसरात राहत असल्याची बातमी मिळाली होती. या मिळालेल्या माहितीवरून पथकातील सफौ. विश्वास खरात ,विशाल गव्हाणे, रवींद्र जाधव व मोसिन शेख यांनी आज रोजी पहाटे मावळ जंगल परिसरात अभिषेक काळवीट याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्याला पौड पोलीस स्टेशनला सुपूर्द करण्यात आले आहे.
सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे , पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक मनोज यादव पौड पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश पवार, विश्वास खरात, ईश्वर जाधव, विशाल गव्हाणे, पोहवा विशाल भोरडे, पोलीस नाईक रवींद्र जाधव मोसिन शेख या पथकाने केली. तांत्रिक मदत सायबर पोलीस स्टेशनचे सुनील कोळी व चेतन पाटील यांनी केली