• December 4, 2022
  • No Comment

मित्र-मैत्रिणींनी चोरीचा आळ घेत तरुणीचे काढले कपडे

मित्र-मैत्रिणींनी चोरीचा आळ घेत तरुणीचे काढले कपडे

एका तरुणीवर चोरीचा आळ घेऊन तिच्याच मित्र आणि मैत्रिणींनी तिचे कपडे उतरवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणी पुण्यातील प्रसिद्ध महाविद्यालयात शिक्षण घेत होती. आरोपींनी तिचा कपडे उतरवल्याचा व्हिडिओ काढून, तो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून 80 हजार रुपये घेतले. सदर घटना लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाघोली गावात 17 ऑक्टोबर रोजी घडली.

याप्रकरणी लोणीकंद पोलीस स्थानकामध्ये तीन तरुणींसह एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने सदर घटनेची तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही हरियाणा राज्यातील मोडियाखेडा गावची रहिवाशी असून, लोणीकंद-वाघोली परिसरातील एका इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षणासाठी आली होती.

आरोपीही त्याच इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतात. एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याने पीडित तरुणी आणि आरोपींपैकी दोन तरुणी या वाघोली येथील फ्लॅटमध्ये राहण्यासाठी होत्या. त्यांच्या रूममधून काही सामान चोरी झाले होते. पीडित मुलीला घरमालकावर संशय असल्याने तिने रूम बदलली आणि दुसऱ्या मुलींसोबत राहण्यासाठी गेली.

दरम्यान, आरोपी मुलीच्या फ्लॅटमध्ये गेले आणि त्यांनी पीडित तरुणीला शिवीगाळ करून तिच्यावर चोरीचा आरोप
केला. एक लॅपटॉप आणि सोन्याची चैन तिने चोरली आहे असे म्हणत तिला एका खोलीत घेऊन जाऊन तिचे कपडे
काढून तिची झडती घेतली.
तसेच याबद्दल कुणाला काही सांगितल्यास व्हिडिओ बनवून व्हायरल करू अशी धमकीही दिली.
तसेच तिच्या विरोधात पोलिसांत तक्रार देण्याची भीती देऊन तिच्याकडून 80 हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले.

आणखी पैशाची मागणी करत आरोपींनी तिला मारण्यास सुरुवात केली होती.
पण, पीडित तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी आले आणि त्यानंतर आरोपींनी
तिथून पळ काढला. या सर्व प्रकाराने घाबरलेली तरुणी आपल्या मूळ गावी माघारी गेली.
तिथे गेल्यानंतर या तरुणीच्या आईने हरियाणा राज्यातील सिरसा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
ही तक्रार लोणीकंद पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून,
अधिक तपास सुरू आहे.

Related post

कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी त्याला मदत करणाऱ्या दलालाने केलेल्या १५ परवान्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी…

पुणे : कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदे याने बनावट पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळविल्याचे उघडकीस आले. शस्त्र…
पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला…
रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे फरार असलेल्या गुंडाला खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद

रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे…

पुणे : वारजे माळवाडी येथील चंद्रलोक बियर बारमध्ये रवी जाधव टोळीने तोडफोड करुन विरोधी टोळीतील दोघांना बेशुद्ध होईपर्यंत कोयत्याने वार करुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *