• December 5, 2022
  • No Comment

गांजा विक्री करणाऱ्या सासु-सुना गजाआड 4 लाखांचा गांजा जप्त

गांजा विक्री करणाऱ्या सासु-सुना गजाआड 4 लाखांचा गांजा जप्त

     

    लोणी काळभोर: गांजा विक्री करणाऱ्या सासु सुनेला पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने 4 लाख रुपयांच्या गांजासह अटक केले आहे. ही कारवाई लोणी काळभोर येथील सोरतापवडी येथे करण्यात आली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना अंमली पदार्थविरोधी पथकाला दोन महिला गांजा विक्रीसाठी गांजा घेऊन जात असल्याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोरतापवाडी येथील चोरघे वस्ती येथे जात दोन्ही आरोपी महिलांना ताब्यात घेतले.

    त्यांची झडती घेतली असता त्या नायलॉनच्या पांढऱ्या रंगाच्या पिशव्यांमध्ये सुतळीने बांधलेला तब्बल 4 लाख 12 हजार 200 रुपयांचा 20 किलो 610 ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. पोलिसांनी दोघी जवळील गांजा मोबाईल जप्त केला.दोघींवरही लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एन.डी.पि.एस. अक्ट अंतर्गत गुन्ह दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धायगुडे करत आहेत.

    सदरची कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे 1 चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदिप शिर्के, प्रविण उत्तेकर, विशाल शिंदे, सचिन माळवे, संदेश काकडे, रेहाना शेख, नितेश जाधव योगेश मोहिते यांनी केली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *