- December 5, 2022
- No Comment
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा सपासप वार करून खून

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा धारदार चाकूने वार करून खून केल्याची घटना हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली असून, पोलिसांनी इंजिनिअर असलेल्या पतीला ताब्यात घेतले आहे. हा प्रकार फुरसुंगीतील भेकराईनगर येथे घडला आहे.
ज्योती राजेंद्र गायकवाड (वय 28) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी राजेंद्र भाऊराव गायकवाड (वय 31) याला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गायकवाड दाम्पत्य भेकराईनगर येथील गुरुदत्त कॉलनी भक्तनिवास येथे राहते. राजेद्र हा इंजिनिअर आहे.

राजेंद्र हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच कारणावरून त्यांच्यामध्ये वाद होत होते.
आज सकाळी याच कारणावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाले. रागाच्या भरात राजेंद्रने पत्नीवर चाकूने सपासप वार केले.
यामध्ये गंभीर जखमी होऊन पत्नीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
मृतदेह ससून हॉस्पिटलमध्ये पाठवून आरोपी पतीला ताब्यात घेतले. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.





