- December 5, 2022
- No Comment
दागिने चोरणा-या मोलकरणीस अटक करून सात तोळे सोन्याचे दागिने केले जप्त
मुलाचा वाढदिवस दापोली येथे साजरा करण्यासाठी
गेले होते वाढदिवस साजरा करून घरी परत आले असता पुजेकरीता सोन्याचे दागिने लागणार असल्याने
त्यांनी कपाटातील ड्रॉवर मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने पाहीले असता ते मिळुन आले नाहीत.त्याबाबत
अज्ञात इसमाविरुध्द हडपसर पोलीस ठाणेस गु.र.नं १५११/२०२२ भा.दं. वि. कलम ३८० प्रमाणे गुन्हा
दाखल करण्यात आला.
दाखल गुन्ह्याचा तपास करीत असताना, फिर्यादी यांचे सातव्या मजल्यावरिल फ्लॅटचे बाहेरील
कुलुप तसेच कपाटाचे देखील कोणतेही नुकसान अगर तोडफोड झालेली नव्हती.त्यामुळे फिर्यादी यांचे
घरामध्ये येणा-या लोकांपैकी कोणीतरी गुन्हा केला असावा ही शक्यता धरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री
अरविंद गोकुळे यांचे मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सपोनि विजयकुमार शिंदे, पोउपनि अविनाश शिंदे
अंमलदार शाहीद शेख यांनी तपास सुरू केला.
तपासादरम्यान फिर्यादी यांचे घरामध्ये काम करणारी एक महिला येत असल्याबाबत माहीती
मिळाली. त्याआधारे त्या महिलेस तपासाबाबत पोलीस ठाणेस बोलावून घेवून तिचेकडे गुन्ह्याचा तपास
केला परंतु उपयुक्त काहीही निष्पन्न झाले नाही.
तपासपथक टिमने तपास पुढे सुरू ठेवुन फिर्यादी यांचे सोसायटी मध्ये असलेले लिफ्ट मधील
सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली गुन्ह्याचे दिवशी काम करणारी महिला ही ४ थ्या मजल्यावर लिफ्ट मधून
बाहेर पडल्याने तपासाची लिंक जुळून येत नव्हती. त्याआधारे नमुद महिलेकडे पुंन्हा तपास करता तिने
तपासादरम्यान वेगवेगळी माहीती दिली. असता तिच्या घराची घरझडती घेतली परंतु घरझडती मध्ये काही
एक मिळून आले नाही.
तपासपथकातील अंमलदार शाहीद शेख यांनी नमुद महिलेच्या घरातील व्यक्ती कोण कोण आहेत
याबाबत माहीती घेत असताना, नमुद महिलेच पती हा रिक्षा ड्रायवर असल्याबाबत समजले. त्याप्रमाणे
रिक्षाची पाहणी केली असता रिक्षाचे मागिल बाजुस असलेल्या सिटखाली काही सोन्याचे दागिने मिळून
आले. त्यावेळेस महिलेने गुन्हा केल्याचे कबुल करून आपणच दागिने हे रिक्षामध्ये ठेवले असल्याचे
सांगीतले. व उर्वरित दागिणे हे राहत असलेल्या टेरेसवरील कच-न्याच्या ड्रममध्ये, लपवले असल्याचे
सांगीतले.तसेच फिर्यादी यांचे फ्लॅटचे दरवाजाच्या दोन चाव्या असल्याने त्यातील एक चावी तिने
तिच्याजवळ ठेवली होती. फिर्यादी हे बाहेरगावी गेल्यानंतर तिने त्या चावीचा वापर करून आत प्रवेश
करून गुन्हा केला असल्याचे सांगतीले.
नमुद आरोपी महिलेकडून ६ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची ठुशी, ३ ग्रॅम
वजनाची सोन्याची अंगठी, नथ, असे ७ तोळे सोने व श्री स्वामी समर्थांचा चांदीचा मुकुट, असा किं. रू
३,५०,०००/ चा माल हस्तगत करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार
रामेश्वर नवले हे करीत आहेत.