- December 5, 2022
- No Comment
पिंपरी येथील खुनाच्या गुन्हयातील ०२ फरारी आरोपींना केले जेरबंद
तपास पथकाचे प्रभारी अधिकारी गजानन जाधव व तपास
पथकातील पोलीस अंमलदार हे पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालीत असताना पोलीस शिपाई ४२९६ ढोणे
यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमी प्रमाणे, पिंपरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर
१०५८/२०२२, भादंवि कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९ आर्म अॅक्ट ३ (२५), ४ (२५), २७ हा दाखल गुन्हा
दिनांक ०२/११/२०२२ रोजी घडला असुन नमुद गुन्हयातील आरोपी नामे १) सुरज रामदास मोहिते,
वय २१ वर्ष, रा. रामनगर, रामन चौक, पिंपरी चिंचवड, पुणे २) करण भिमराव वंजारी, वय २० वर्ष, रा.
शरदनगर, चिखली, पिंपरी चिंचवड, गुन्हा केल्यानंतर पळुन गेले असुन ते सध्या लोणीकंद पोलीस
स्टेशनचे हद्दीत गोरे वस्ती, गायरान, वाघोली, पुणे येथे राहणेस आले आहे.
लागलीच नमुद बातमीप्रमाणे प्रभारी अधिकारी गजानन जाधव व तपास पथकातील
पोलीस अंमलदार यांनी शिताफीने वर नमुद आरोपींना गोरे वस्ती, गायरान, वाघोली, पुणे येथुन ताब्यात घेवुन
अधिक चौकशी केली असता त्यांनी वर नमुद गुन्हा केला असल्याचे कबुल केल्याने त्यांना नमुद गुन्हयाचे
पुढील तपासकामी पिंपरी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड आयुक्तालाय यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. शशिकांत बोराटे साो, पोलीस उपआयुक्त सो, परिमंडळ ४, पुणे
शहर, मा. श्री. गजानन पवार सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर, मा. श्री.
मारुती पाटील , पोलीस निरीक्षक (गुन्हे), लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर, यांचे मार्गदर्शना खाली
तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक गजानन जाधव, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकाटे, स्वप्निल
जाधव, विनायक साळवे, कैलास साळुंके, सागर जगताप, अजित फरांदे, अमोल ढोणे, पांडुरंग माने,
साईनाथ रोकडे, दिपक कोकरे, आशिष लोहार, बाळासाहेब तनपुरे यांनी केली आहे.