• December 10, 2022
  • No Comment

मित्राचा खून केल्याच्या संशयातून एकावर प्राणघात हल्ला

मित्राचा खून केल्याच्या संशयातून एकावर प्राणघात हल्ला

     

    पुणे: मित्राचा खून केल्याच्या संशयातून पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जुनी म्हाडा वसाहत या ठिकाणी हा प्रकार घडला.

    एकाला अटक केली. मुस्तफा उर्फ खड्डा शेख (वय 20, रा. नवीन म्हाडा वसाहत) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात शुभम भंडारी (वय 26) यांनी तक्रार दिली आहे. तर, शेख याच्या चार साथीदारांवर गुन्हा दाखलकरण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम त्याच्या चुलत भावाच्या घरून कारने परत निघाला होता. त्यावेळी या टोळक्याने त्याचा पाठलाग केला. संशय आल्याने शुभमने पुन्हा कार युटर्न घेत भावाचे घर गाठले, तर या आरोपांनी देखील त्याचा पाठलाग करून तो पळत चौथ्या मजल्यावर जात असताना टोळकेही त्याच्या पाठिमागे धावले. त्यावेळी शुभम एका ओळखीच्या घरात शिरला व दरवाजा आतून लावून घेतला.

    आरोपींनी त्याला तू आमचा मित्र बसवराज कांबळे याचा मर्डर केला आहे. तुला जीवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन त्याच्यावर हल्ला करून खूनाचा प्रयत्न केला. पुढील तपास पोलीस करत आहेत

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *