• December 10, 2022
  • No Comment

अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोघांना अटक

अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोघांना अटक

     

    कोथरूड: कोथरूड येथून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोघांना कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांनी हिल व्हू या सोसायटी समोर केली.

    पोलिसांना परिसरात दोन जण मेफेड्रोन (एम.डी.) विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. रवी मोहनसिंग राठोड उर्फ बिल्ला (वय 36, रा. भुगाव, मुळ राजस्थान) व आदित्य संदिप माण (वय 23, रा. बावधन) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

    पोलिसांनी आरोपींना दुचाकीसह ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता 6 ग्रॅम 750 मिली ग्रॅम वजनाचे 1 लाख 1 हजार 250 रुपयांचे एमडी जप्त केले. तसेच, 3 मोबाईल 27 हजार 70 हजार रुपयांची बुलेट असा एकूण 1 लाख 98 हजार 205 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी आरोपींवर कोथरूड पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *