• December 10, 2022
  • No Comment

अल्पवयीन मुलाकडून एकाचा खून, पाच जणांवर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलाकडून एकाचा खून, पाच जणांवर गुन्हा दाखल

     

    सहकार नगर: 17 वर्षीय अल्पवयीन मुलांनी चाकूने छातीवर तोंडावर आणि डोक्यात वार करून एका 19 वर्षीय मुलाचा खून केला. पुण्यातील तळजाई टेकडी परिसरात हा प्रकार घडला.

    मयत तरुण मैत्रिणींसोबत फिरण्यासाठी गेला असता हा प्रकार घडला आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत.

    साहिल चांगदेव कसबे (वय 19) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, आरोपी करण उर्फ सोन्या रवी वाघमारे (वय 18) आणि गौरव गोकुळ केंद्रे (वय 20) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर, दोन अल्पवयीन आरोपींना देखील ताब्यात घेतले आहे. अनिकेत चांगदेव कसबे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत साहिल कसबे हा त्याच्या मित्र आणि मैत्रिणी सोबत सदू शिंदे क्रिकेट मैदानाजवळ गप्पा मारत थांबला होता. यावेळी त्याच्या तोंड ओळखीचे असलेले आरोपी हातात बांबू घेऊन त्या ठिकाणी आले. आरोपी करण वाघमारे यांनी साहिल याची गचांडी पकडून तू भाई झालास का?

    दुसऱ्यांच्या मैत्रिणींना घेऊन फिरतोस काय असे म्हणून आरोपींनी त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तर, एका 17 वर्षाच्या अल्पवयीन आरोपीने चाकूने त्याच्या छातीवर डोक्यावर आणि तोंडावर वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने साहिल याचा मृत्यू झाला आहे. सहकार नगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *