• December 10, 2022
  • No Comment

PF जमा झाल्याचा मेसेज येतोय पण खात्यात जमा होतोय का? पहा सविस्तर

PF जमा झाल्याचा मेसेज येतोय पण खात्यात जमा होतोय का? पहा सविस्तर

     

    खासगी असो किंवा सरकारी 50 हून अधिक कर्मचारी काम करणाऱ्या कंपनीतील बहुतांश कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्याच्या पगारातून EPFO ची रक्कम कापली जाते. ही रक्कम बेसिक पगाराच्या 12 टक्के एवढी असते.

    जस कंपनी पगारातून १२ टक्के रक्कम कापते त्याच प्रमाणे कंपनी देखील तेवढीच रक्कम EPFO मध्ये भरत असते. तुम्हाला EPFO मध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज तर आला पण खरंच जर तुमच्या खात्यावर रक्कम जमा झाली की नाही तेही तपासून पाहाणं आवश्यक आहे. तुम्ही जर तपासून पाहात नसाल तर तुम्ही चूक करताय. आजपासून तुम्ही तुमच्या खात्यावर ही रक्कम जमा होते का तपासून पाहायला हवं.

    एखाद्या कर्मचाऱ्याने वेळोवेळी आपला पीएफ शिल्लक तपासणे आवश्यक आहे. तुम्ही EPFO च्या वेबसाईटवर जाऊन तिथे चेक करू शकता. यासाठी तुम्हाला UAN नंबर अॅक्टिव्हेट करावा लागेल. तो झाल्यानंतर पासवर्ड सेट करा आणि UAN नंबर आणि पासवर्डच्या मदतीने तुम्ही लॉगइन करा.

    वर तुम्हाला पासबुकचा पर्याय दिसेल तिथे पुन्हा तुम्हाला लॉगइन करायचं आहे. पासबुकला UAN नंबर आणि पासवर्ड अपलोड केल्यानंतर लॉगइन करून तुम्हाला पाहता येईल. याशिवाय तुम्ही उमंग अॅपवरून देखील पाहू शकता. एसएमएसद्वारे ईपीएफ शिल्लक रक्कम तपासता येते.

    जर तुम्ही ईपीएफओकडे तुमचा यूएएन आणि मोबाइल नंबर रजिस्टर केला असेल तर एसएमएस पाठवून तुम्ही तुमचा पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त 7738299899 एसएमएस पाठवायचा आहे. जर तुम्हाला तुमचा बॅलन्स इंग्रजी भाषेत हवा असेल, तर तुम्हाला टाइप करावं लागेल – EPFOHO UAN ENG. इथे UAN आपले वैयक्तिक यूएएन असेल, तर ENG ही आपल्या भाषेच्या पसंतीची पहिली तीन अक्षरे आहेत.

    इंग्रजी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, पंजाबी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये तुम्हाला तुमचा बॅलन्स चेक करण्याची मुभा देण्यात आली आहे. युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) हा कर्मचारी आणि त्याच्या कंपनी या दोघांसाठी एक ठरवून दिलेला कोड नंबर आहे. हा12-अंकी नंबर म्हणजे एकप्रकारे खातेदाराचं ओळखपत्रच असतं. हा क्रमांक कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे जारी केला जातो आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) द्वारे दिला जातो. एकदा यूएएन तयार झाल्यावर ते बदलले जात नाही. तुम्ही कितीही नोकऱ्या बदलल्या असल्या, तरी तुमच्या नोकरीच्या काळातही ते तसंच राहतं. प्रत्येक वेळी आपण नोकरी बदलता, तेव्हा ईपीएफओ आपल्याला नोटिफिकेशनवर एक नवीन सदस्य ओळख क्रमांक (आयडी) प्रदान करते, जो आपल्या विद्यमान यूएएनशी जोडलेला आहे.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *