• December 10, 2022
  • No Comment

सोनसाखळी चोरणारे अट्टल चोरटे गजाआड,आरोपीविरुद्ध पुर्वीचे सोळा गुन्हे उघडकीस

सोनसाखळी चोरणारे अट्टल चोरटे गजाआड,आरोपीविरुद्ध पुर्वीचे सोळा गुन्हे उघडकीस

     

     

    हिंजवडी: धुम चित्रपटात दाखवल्याप्रमाणे वाऱ्याच्या वेगाने दुचाकी चालवून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या अट्टल चोरांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल 16 गुन्हे उघडकीस आणले आहे.

    आकाश वजीर राठोड (वय 22, रा. मुलखेड, ता. मुळशी) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यासह चोरीचे दागिने घेऊन पुढे विकणारा मध्यस्थी सोमपाल नारायण सिंह (वय 31, रा. हरवर, हार्बर, डुंगारपूर, पाल, निठाउवा, राजस्थान) यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्यात 23 नोव्हेंबर रोजी हिंजवडी फेज तीन येथे एका महिलेच्या गळ्यातील दागिने जबरदस्तीने चोरून नेल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील 52 सीसीटीव्ही फुटेज पाहणी केली. यामध्ये एक जण संशयित आढळून आला. पोलिसांनी त्याच्यावर नजर ठेवली असता सहायक निरीक्षक सागर काटे आणि राम गोमारे यांना माहिती मिळाली की, सीसीटीव्ही फुटेज मधील संशयित तरुण मेगापोलीस सर्कल फेज तीन येथे येणार आहे.

    एक तरुण पल्सर दुचाकीवरून आला, त्याची हालचाल संशयित असल्याने पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता तो पळून जाऊ लागला. दुचाकीस्वाराला दुचाकीसह ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार बिश्रांत नानावत, मंगल नानावत, अमर राठोड यांच्यासोबत मिळून 14 ठिकाणी जबरी चोरी आणि दोन ठिकाणी वाहन चोरी केली असल्याचे सांगितले.

    या कारवाईमध्ये 11 लाख 71 हजार रुपये किमतीचे 22 तोळे सोन्याचे दागिने आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. यात तळेगाव, रावेत पोलीस ठाण्यातील प्रत्येकी दोन, कामशेत, चिंचवड, पिंपरी, चिखली, एमआयडीसी भोसरी, सासवड, सुपा अहमदनगर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी आकाश हा सोमपाल सिंह याच्या मध्यस्थीने दागिने विकत असे. सोमपाल हा राजस्थान येथून येऊन जाऊन चोरीचे दागिने विकत घेत असे.

    आकाश हा सराईत चोरटा आहे. चोरीच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने तीन साथीदारांसोबत मिळून पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण आणि अहमदनगर येथे तब्बल 16 गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. हा चोरटा चोरलेले दागिने राजस्थान येथील मध्यस्थीच्या मदतीने पुढे विकत असे.

    सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक रमेश पवार, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, कैलास केंगले, विक्रम कुदळ, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, बापूसाहेब धुमाळ, अरुण नरळे, चंद्रकांत गडदे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, दत्ता शिंदे, सुभाष गुरव, सागर पंडित, सोनाली ढोणे यांच्या पथकाने केली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *