• December 10, 2022
  • No Comment

लग्नाच्या आमिषाने ‘लॉ’च्या विद्यार्थिनीवर बलात्कार

लग्नाच्या आमिषाने ‘लॉ’च्या विद्यार्थिनीवर बलात्कार

     

    कसबा पेठे: फोनवरून ओळख झाल्यानंतर एका 32 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील कसबा पेठेत हा प्रकार घडला.

    पीडित तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली असून आरोपी शिवप्रसाद विठ्ठलराव दुधाटे (वय 35) त्याच्या विरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही लॉची विद्यार्थिनी आहे. ती मूळची परभणी जिल्ह्यातील आहे. काही दिवसांपूर्वी ती पुण्यातील बहिणीकडे राहण्यासाठी आली होती. त्यावेळी एका रॉंग नंबर वरून आरोपी आणि फिर्यादी यांची ओळख झाली होती. यातून आरोपी आणि फिर्यादी यांची ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेऊन आरोपीने फिर्यादीला मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे असे म्हणून फिर्यादी नकार देत असतानाही जबरदस्तीने तिच्यासोबत शरीर संबंध आणि अनैसर्गिक शरीर संबंध ठेवले. 28 ऑक्टोबर रोजी कसबा पेठेत हा प्रकार घडला.


    फिर्यादी तरुणीची परीक्षा असल्यामुळे ती मूळ गावी परीक्षा देण्यासाठी गेली होती. तिथून परत आल्यानंतर तिने फरासखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *