- December 13, 2022
- No Comment
सानेगुरुजी रुग्णालयात बेशिस्तपणाचा कळस,रुग्ण बेजार

हडपसर;डॉक्टर दादा गुजर यांनी हडपसर मधील गरीब गरजु रुग्णसेवेसाठी साने गुरुजी रुग्णालयाची स्थापना केली.गेली कित्येक दशकांपासून या रुग्णालयात हडपसर येथील नागरिकांना रुग्णसेवेचा फायदा घेण्यात आला असुन पूर्वीचे चित्र पाहता सध्याचे व्यवस्थापन हे ढिम्म दिसुन येत आहे.लहान बालकांना लसीकरणाची वेळ नऊ वाजताची असुनही एक-एक तास उशीरा डॉक्टरांचा तपास नाही.गारठ्यात सकाळपासून नवजात बालके घेउन रांगाच्या रांगा लागल्याच्या दिसुन येत आहे.तक्रार कक्षातही कोणी उपलब्ध नाही.बेजार रुग्णांनी तक्रार करायची तरी कुठे?असा प्रश्न रुग्णांचे नातेवाईक करीत आहेत.






