• December 14, 2022
  • No Comment

पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी रितेशकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे

पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी रितेशकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे

    पुणे – अमिताभ गुप्ता यांच्यानंतर पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी कोण? या प्रश्‍नावरुन मागील काही महिन्यांपासून सुरु असलेल्या चर्चेला अखेर पुर्णविराम मिळाला आहे. पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी रितेशकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने मंगळवारी रात्री उशीरा याबाबतचे आदेश काढले. “पुणेकरांना चांगल्या कामाची प्रचिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करु’ असा विश्‍वास रितेशकुमार यांनी “सकाळ’शी बोलताना व्यक्त केला आहे. शहरातील संघटीत गुन्हेगारीसह उदयोन्मुख गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायद्याचा (मोका) वापर करुन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारांवर वचक बसविला होता.

    “मोका’, एमपीडीए’ यांसारख्या कायद्यांचा योग्य वापर करीत शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. एकीकडे गुन्हेगारीवर नियंत्रण बसविण्यास यश येत असतानाच, दुसरीकडे वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यामध्ये गुप्ता यांना अपयश आले होते. त्याची सल गुप्ता यांना होती, दरम्यान, त्यांनी दोन महिन्यांपुर्वी वाहतुक शाखेमध्ये मोठे फेरबदल करुन, तसेच नव्याने आलेल्या पोलिस उपायुक्तांना रस्त्यावर उतरुन वाहतुक शाखेला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्याला आता यश येऊ लागले होते. दरम्यान, गुप्ता यांचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात पुर्ण झाला होता. तेव्हापासून त्यांच्या बदलीबाबत चर्चा सुरु होती. या चर्चेला मंगळवारी रात्री पुर्णविराम मिळाला.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *