- December 14, 2022
- No Comment
तरुणाचा बोपदेव घाटात गोळी झाडून खून
हडपसर : हडपसरमधून दोन
दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या एका
तरुणाचा बोपदेव घाटात गोळी झाडून
खून केल्याचा प्रकार समोर आला
आहे. खून नाट्यमयरीत्या घडल्याचे व
त्यानंतरच प्लॅनिंगही तशाच पद्धतीने
केल्याचे पोलिसांनी समोर आणले
आहे. पोलिसांनी चौघांना अटक
केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गणेश
नाना मुळे (वय २१, रा. सातववाडी)
असे खून झालेल्या तरुणाचे नाव.
याप्रकरणी पोलिसांनी योगेश सुभाष
भिलारे (२४), रोहन राजेंद्र गायकवाड
(वय २३) व अक्षय संदीप गंगावणे
(२१), चेतन परमेश्वर कुदळे अशी
अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही
कारवाई पोलिस उपायुक्त अमोल
झेंडे, सहायक आयुक्त नारायण
क्षीरसागर व पोलिस निरीक्षक हेमंत
पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे.
गणेश मुळे व संशयित आरोपी मित्र
आहेत. रविवारी हडपसरमधून गणेश
बेपत्ता झाला होता; पण पुन्हा घरी
परतला नव्हता. युनिट पाचचे पोलिस
निरीक्षक हेमंत पाटील व पथक हद्दीत
गस्त घालत होते. सोमवारी पथकाला
गणेश हा दोन दिवसांपासून गायब
आहे. या मुलांसोबतच तोही फिरत असतो
पण दोन दिवसांपासून दिसत
नाही. ही मुले आलेली आहेत. काही
तरी गडबड असावी, असेही समजले.
तात्काळ पोलिस निरीक्षक हेमंत
पाटील व पथकाने गणेशचा शोध
घेण्यास सुरुवात केली. या मित्रांना
ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनीच
चुकून गोळी लागून त्याचा मृत्यू झाला
होता. तसेच त्याचा मृतदेह बोपदेव
घाटात टाकल्याची माहिती समोर
आली.
बोपदेव घाटात गणेशचा मृतदेह
आढळून आला. पोलिसांनी खुनाची
खात्री पटताच या संशयितांकडे
सखोल माहिती घेण्यात आली.
यावेळी तिघांनी चुकून गोळी झाडली
गेली व ती गणेशला लागल्याची
माहिती दिली. पोलिसांनी या तिघांना
अटक केली, तर त्यांचा एक साथीदार
असून, तो फरार आहे. पोलिस
निरीक्षक हेमंत पाटील, चैताली गपाट,
प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड,
राहुल ढमढेरे, रमेश साबळे या
कर्मचाऱ्यांनी तपासाचे काम पाहिले.