- December 14, 2022
- No Comment
वॉर्ड क्रमांक चारच नाही तर आव्हाळवाडी गावचा संपुर्ण विकास करणार,शब्द नाहीत वचन देते-अनुष्का सातव

वाघोली-आव्हाळवाडी:गावची निवडणूक चार दिवसावर येऊन ठाकली असुन कित्येक उमेदवार आपले नशीब आजमावून पाहत आहे.आपापल्या परीने प्रचार गाठीभेटी घेताना दिसत आहेत. आव्हाळवाडी वार्ड क्र चारच्या उमेदवार अनुष्का गणेश सातव यांनी प्रचाराआधी शासकीय योजनांचा प्रसार केला,वैयक्तिक खर्चांनी शासकीय योजनांचे मेळावे घेऊन जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचविण्यात यशस्वी झाल्या.’निवडणुका येतील जातील परंतु मी कायमस्वरुपी, माझ्या गावातील प्रत्येक नागरिकाला शासकीय योजना,विमा,बचत,आरोग्य, तरुणांसाठी कर्ज,यावर काम करणार’असे अनुष्का सातव यांनी सांगितले





