- December 14, 2022
- No Comment
फ्लॅट विकत देण्याच्या आमिषाने लोकांची फसवणूक करणारा टोळका जेरबंद

वडमुखवाडी: वडमुखवाडी या ठिकाणी फ्लॅट विकत देण्याचे अमिष दाखवून एकूण 8 लोकांकडून 52.73 लाख रुपये घेऊन फ्लॅट न देता घेतलेल्या रकमेचा अपहार करणाऱ्यास अटक करण्यात आल्याची माहिती एच. व्ही.माने (सहाय्यक पोलीस निरीक्षक, गुंडा विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड) यांनी दिली आहे.
न्यायाल्याने आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. महेश बापू लोंढे (वय 42 वर्षे, रा. मूळ गाव अहमदनगर) या आरोपीस अटक करण्यात आले आहे.

पोलीसांनि दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेश याने वडमुखवाडी या ठिकाणी फ्लॅट विकत देण्याचे अमिष दाखवून एकूण 8 लोकांकडून 52 लाख 73 हजार रुपये घेऊन फ्लॅट न देता घेतलेल्या रकमेचा अपहार केला. त्याच्या विरोधात एमआयडीसी भोसरी आणि दिघी पोलीस स्टेशन येथे 2018 पासून एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर आरोपी हा सुमारे 4 वर्षापासून आपण पकडू जाऊ नये म्हणून राहण्याचे ठिकाण आणि संपर्क क्रमांक सतत बदलत होता.

10 डिसेंबर रोजी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती प्राप्त करून त्याला सेक्टर 6, मोशी प्राधिकरण येथून ताब्यात घेण्यात आले. त्याची वैद्यकीय तपासणी करून योग्य ते गुन्हे नोंदवून पुढील कारवाईसाठी दिघी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती माने यांनी दिली.




