- December 14, 2022
- No Comment
शाईफेक प्रकरणातील तिघांना अखेर जामीन मिळाला, कार्यकर्त्यांकडून जल्लोष
पुणे: पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केलेल्या तिघांना पिंपरी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या निमित्ताने पिंपरीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात (बुधवारी) पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला.
न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करायचे आहे. हा विजय हा भारतीय संविधानाचा विजय आहे, हा विजय हा भारतीय लोकशाहीचा विजय आहे, हा विजय हा पुरोगामी चळवळीचा विजय आहे, हा विजय महापुरुषांच्या सन्मानार्थ न्यायालयाने दिलेला विजय आहे, असे मत पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी व्यक्त केले आहे. आंबेडकर चौकात हलगी वाजवून व फुगड्या घालून जल्लोष साजरा करण्यात आला.

चिंचवड पोलिसांनी शनिवारी (दि.10) मनोज भास्कर घरबडे, धनंजय भाऊसाहेब बिजगज, विजय धर्मा ओव्हाळ या तिघांना पालकमंत्री पाटील यांच्यावर शाईफेक केल्या प्रकरणी अटक केली होती. त्यांना आज न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
