- December 14, 2022
- No Comment
क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट पाहण्याच्या बहाण्याने सदोतिस हजारांना घातला गंडा,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
चिखली: स्टेटमेंट पाहण्यासाठी म्हणून क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती घेऊन त्याआधारे 37 हजार 270 रुपये ऑनलाईन माध्यमातून ट्रान्सफर करत फसवणूक केली. ही घटना जाधववाडी चिखली येथे घडली.
नामदेव अर्जुन चव्हाण (वय 26, रा. जाधववाडी, चिखली) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. 13) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामदेव चव्हाण यांना अज्ञाताने फोन करून क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट पाहण्यासाठी एक अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यामध्ये चव्हाण यांना त्यांची वैयक्तिक माहिती भरून क्रेडिट कार्डमधून 37 हजार 270 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.