• December 14, 2022
  • No Comment

किरकोळ कारणावरून सलून मालकावर कोयत्याने वार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

     

    आंबेगाव: पिण्यासाठी पाण्याची बॉटल मागूनही न दिल्याने तिघा जणांनी सलून मालकावर जीवघेणा हल्ला केला. कोयत्याने वार करत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केलाय. आंबेगाव खुर्द येथील जांभूळवाडी रोडवरील शिवस्व मेन्स पार्लर समोर हा प्रकार घडला. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सोन्या कांबळे, गोविंद लोखंडे यांच्यासह एका अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्निल पंढरीनाथ तावरे (वय 27) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

    पोलीसांनि दिलेल्या माहितीनुसार, की फिर्यादी यांचे जांभुळवाडी रस्ता परिसरात सलूनचे दुकान आहे. आरोपींनी त्यांच्या दुकानात येऊन पिण्यासाठी पाण्याची बॉटल मागितली होती. मात्र फिर्यादी यांनी पाण्याची बॉटल नाही असे आरोपींना सांगितले होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून धमकी दिली होती.

    त्यानंतर फिर्यादी हे रात्रीच्या वेळी दुकानात असताना तीनही आरोपींनी दुकानात येऊन त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तर अनोळखी असलेल्या आरोपीने फिर्यादी यांना ठार मारण्याचा उद्देशाने त्यांच्या डोक्यात आणि गळ्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *