- December 14, 2022
- No Comment
कीरकोळ वादातुन पत्नीवर कुऱ्हाडीने वार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
हडपसर: नांदण्यासाठी घरी न येणाऱ्या पत्नीवर सासरी जाऊन पतीने कुऱ्हाडीने वार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मध्यस्थी करणाऱ्या पत्नीच्या आईच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी करण्यात यावे.
हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील फुरसुंगी परिसरात हा प्रकार घडला. हडपसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी चेतन जंगले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 27 वर्षीय पत्नीने याप्रकरणी तक्रार दिली आहे.

पोलीसांनि दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादींचा पती आहे. आरोपी फिर्यादीच्या आईच्या घरी गेला. त्या ठिकाणी जाऊन त्याने फिर्यादी यांना तू घरी का येत नाही असे बोलत त्यांच्याशी वाद घातला आणि शिवीगाळ केली. आज तुझा मर्डरच करतो असे बोलून त्याने हातातील कुराड फिर्यादी यांना ठार मारण्याचा उद्देशाने डोक्यात मारली. मात्र फिर्यादी यांनी ती हुकवली.

फिर्यादी महिलेची आई मध्यस्थी करण्यासाठी आली असता आरोपीने त्यांच्या डोक्यात कुराडीने वार केला. फिर्यादी यांची आई यामध्ये गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.