• December 14, 2022
  • No Comment

पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल

     

    चाकण: दारु पिऊन पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीवर व भांडणे सोडविण्या ऐवजी त्यात भर पाडणाऱ्य़ा सासू साऱ्यावर ही चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा प्रकार खेड येथील पाईट या गावी घडला.

    याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली असून पती सचीन सिताराम सोनवणे (वय 38), सासू व सासरे सिताराम केशव सोनवणे सर्व राहणार पाईट, खेड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला आरोपी हे मागील आठ महिन्यापासून त्रास देत आहेत. सोमवारीही सचिन दारु पिऊन आला व त्याने किरकोळ कारणावरून फिर्यादी यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. पुढे त्याने घरातील काठीने फिर्यादीला मारहाण कऱण्यात सुरुवात केली. यावेळी सासू-सासऱ्यांनी भांडणे सोडविण्या ऐवजी सचिनला पुन्हा फिर्यादीला मारण्यास चिथावणी दिली. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *