• December 16, 2022
  • No Comment

टुरिस्ट पॅकेज देतो म्हणत पाच लाखांना घातला गंडा

टुरिस्ट पॅकेज देतो म्हणत पाच लाखांना घातला गंडा

     

    वाकड: टुरिस्ट पॅकेज देतो म्हणत 11 जणांची 5.45 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. एका महिलेने याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    याप्रकरणी सुनिल सरोदे, वय 35 वर्षे अंदाजे, रा. चिंचवडेनगर, वय 35 वर्षे अंदाजे, रा. फलटण, आशिष, वय 37 वर्षे अंदाजे, रा. विमाननगर, रवी गुप्ता, वय 34 वर्षे, शैलेंद्र गायकवाड, या आरोपींच्या विरोधात भा.द.वि कलम 420, 406, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलीसांनि दिलेल्या माहितीनुसार, हा गुन्हा हब, तिसरा मजला, डांगे चौक थेरगाव येथे घडला आहे.आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांना टुरिस्ट पॅकेज देतो, असे खोटे आश्वासन देऊन फिर्यादी यांना पैसे भरण्यास भाग पाडून कोणतीही सेवा न देता फिर्यादी यांची 55,000 रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.

    तसेच फिर्यादी हे पोलीस स्टेशन येथे आल्यावर समजले की, त्यांच्यासारखी इतर 10 लोकांची एकूण 4.90 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. तसेच आणखी बऱ्याच लोकांना या आरोपींनी गंडा घातला असल्याची शक्यता आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *