- December 16, 2022
- No Comment
झेरॉक्स विक्रेत्यावर कॉपीराईटचा गुन्हा
सिंहगड कॉलेज कॅम्पस परिसरात टेकनॉलेज पब्लिकेशन्स या प्रकाशन कंपनीच्या मूळ पुस्तकांच्या
झेरॉक्स काढून त्यांच्या प्रती विकणाऱ्या नाईस झेरॉक्स सेंटरवर भारती विद्यापीठ पोलिसांनी छापे
टाकून कॉपीराईट कायद्याअंतर्गत कारवाई केली. त्यांच्याकडून टेकनॉलेज पब्लिकेशन्सची झेरॉक्स
केलेली पुस्तके व बेकायदेशीर मुद्देमाल असे एकूण २,१६,०७३/- रुपये किंमतीचे कॉपीराईटचे
साहित्य जप्त केले.

याप्रकरणी कंपनीचे कायदेशीर सल्लागार सचिन मारुती गायकवाड (वय ३८, रा. बालाजीनगर)
यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, सिद्धराज देवराज बंगाली (वय २१,
रा. आंबेगाव बु. मूळ:गुजरात), हिंदू देवा भरवाड (वय १९, रा. आंबेगाव बु. मूळ:गुजरात), गोविंद
देवराज बंगाली (वय १९, रा. आंबेगाव बु. मूळःगुजरात) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची
नावे आहेत.
सचिन गायकवाड हे टेकनॉलेज पब्लिकेशन्सचे कायदेशीर सल्लागार आहेत. त्यांच्या प्रकाशनाची
पुस्तके कॉपी करून विक्री करणाऱ्यांबाबत तक्रार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे.

दरम्यान सिंहगड कॉलेज कॅम्पस परिसरात नाईस झेरॉक्स सेंटर शॉप नं. ५ व शॉप नं. १ या
दुकानांमध्ये टेकनॉलेज पब्लिकेशन्सची पुस्तके झेरॉक्स करून त्याची महाविद्यालयीन तरुणांना
अल्पदरात विक्री करत असल्याची माहिती गायकवाड यांना मिळाली होती. त्यानुसार मा. पोलीस
उपआयुक्त सो, परिमंडळ-२, पुणे शहर यांचे आदेशानुसार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. श्रीहरी बहिरट साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक
श्रीमती वर्षा घोगरे मॅडम, पोलीस शिपाई वीर व आंबेगाव पठार मार्शलवरील पोलीस शिपाई घोडके
व पोलीस शिपाई जनवाड यांनी या झेरॉक्स सेंटरवर छापे टाकले. त्यावेळी त्यांच्याकडे टेकनॉलेज
पब्लिकेशन्सच्या पुस्तकांचा झेरॉक्स केलेला साठा मिळून आला. पोलिसांनी झेरॉक्स मशीन्स,
संगणक व पुस्तकांचा झेरॉक्स केलेला साठा जप्त केला.