- December 16, 2022
- No Comment
नवीन जनधन खाते कसे उघडायचे?
प्रधानमंत्री जनधन योजनेच्या (Pradhan Mantri Jandhan Yojana) माध्यमातून देशातील गरीब लोकांचे खाते झिरो बॅलेन्सवर बँक, टपाल कार्यालये आणि राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये उघडले जात आहे.
नवीन जनधन खाते कसे उघडायचे?
१. तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन तिथे जनधन अकाऊंटचा फॉर्म भरावा लागेल.
२. तुमची आवश्यक ती सर्व माहिती द्यावी लागेल.
उदा. अर्ज करणाऱ्या व्यक्तीला नाव, मोबाईल नंबर, बँकेच्या ब्रांचचे नाव, पत्ता, नॉमिनी (वारसदार), व्यवसाय / रोजगार, वार्षिक उत्पन्न, घरातील सदस्य संख्या, एसएसए कोड किंवा वार्ड नंबर, व्हिलेज कोड (गावाचा नंबर) याबद्दल माहिती द्यावी लागेल.
३.तसेच PMJDY च्या संकेतस्थावरील दिलेल्या माहितीनुसार, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड नंबर, मतदान कार्ड, राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची सही असलेले मनरेगा जॉब कार्डच्या आधारे तुम्ही तुमचे जनधन अकाऊंट उघडू शकता.