- December 20, 2022
- No Comment
आव्हाळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत खंडोबा प्रगती पॅनेलची बाजी
खंडोबा प्रगती पॅनेलची बाजी आव्हाळवाडी ता. हवेली, ग्रामपंचायत
निवडणुकीत खंडोबा प्रगती पॅनलने बाजी मारली. खंडोबा प्रगती पॅनलने
सरपंच पदासह सात जागांवर विजय मिळवत ग्रामपंचायतची सत्ता
अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत हवेली पंचायत समितीचे माजी
सभापती नारायण आव्हाळे हे आपल्या हाती ठेवण्यात यशस्वी झाले आहेत.
यावेळी जनतेतून सरपंच पदाची निवड होत असताना अतिशय चुरशीच्या
निवडणुकीत सरपंच पदी नितीन घोलप यांनी बाजी मारली. घोलप हे
खंडोबा प्रगती पॅनलचे उमेदवार होते. तर संदेश आव्हाळे यांच्या खंडोबा
परिवर्तन पॅनलचे तीन उमेदवार निवडून आले. तसेच तीन अपक्ष
उमेदवारांनी ही वार्ड क्रमांक दोन मधून बाजी मारली. यामध्ये माजी सदस्य
काका सातव यांचा समावेश आहे. माजी सभापती नारायण आव्हाळे यांच्या
पॅनेलचा सरपंच निवडून आल्याने व बहुमत प्राप्त झाल्याने कार्यकर्त्यांनी
भंडाऱ्याची मुक्त उधळण व फटाक्यांचे आतषबाजीत करत आनंदोत्सव
साजरा केला .विजय उमेदवारांसह नारायण आव्हाळे यांच्यावर परिसरातून
अभिनंदनचा वर्षाव होताना पहावयास मिळाला. निवडून आलेले विजयी
उमेदवार पुढील प्रमाणे वार्ड क्रमांक एक – प्रशांत सातव, सोनाली दाभाडे
(खंडोबा प्रगती पॅनेल) वार्ड क्रमांक दोन- काकासाहेब सातव, सविता
सातव, सारिका सातव (सर्व अपक्ष) वार्ड क्रमांक तीन- कोमल
आव्हाळे, सोमनाथ आव्हाळे (खंडोबा परिवर्तन पॅनेल) वार्ड क्रमांक चार-
मंगेश सातव, अनुष्का सातव (खंडोबा प्रगती पॅनेल), अविनाश कुटे
(खंडोबा परिवर्तन पॅनेल) वार्ड क्रमांक पाच- अमोल आव्हाळे, पल्लवी
आव्हाळे, बदामबाई आव्हाळे (खंडोबा प्रगती पॅनेल) सरपंच पदासाठी
नितीन घोलप (खंडोबा प्रगती पॅनेल)