- December 21, 2022
- No Comment
मोक्यातील दोन पाहिजे आरोपींच्या आवळल्या मुसक्या
खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर
कडील पोलीस, अंमलदार रविंद्र फुलपगारे, प्रमोद सोनावणे व राजेंद्र लांडगे यांना
त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीच्या आधारे विश्रांतवाडी पो. ठाणे गुरनं.
२७४/२०२२,कलम ३०७,३०८,४४७,१४१,१४३,१४४,१४८,१४९, आर्म अॅक्ट ३ (२५),
महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) १३५, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट, कलम ३
व ७, महाराष्ट्र संघटित नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (II), ३ (४) या
गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे १ सोन्या ऊर्फ राज रविंद्र भवार, वय – २२ वर्षे
रा.विश्रांतवाडी,धानोरी, पुणे यास चांदणी चौक, कोथरुड, पुणे येथून व २ गौरव सुनिल
कदम,वय-२२ वर्षे,रा.स.नं.३६, छत्रपती शाहू महाराज सोसायटी, फलॅट नं.२७,धानोरी
रोड,विश्रांतवाडी,पुणे यास हॉटेल सुभाष बिअरबार व परमिट रुम ता. अकलूज जि.
सोलापूर येथून शिताफीने सापळा रचून ताब्यात घेवून त्यांची वैदयकीय तपासणी करून
त्यांना पुढील तपासकामी विश्रांतवाडी पो.ठाणे यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरचा कारवाई मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह
आयुक्त श्री.संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री.रामनाथ पोकळे,
मा.पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा पो आयुक्त, गुन्हे १,श्री.गजानन
टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-१, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक,
अजय वाघमारे, सपोनि अभिजीत पाटील, पो. उप-निरीक्षक विकास जाधव, पोलीस
अंमलदार रविंद्र फुलपगारे, राजेंद्र लांडगे, प्रमोद सोनावणे, सयाजी चव्हाण, मधुकर
तुपसौंदर, अमोल आवाड, प्रविण ढमाळ, नितीन कांबळे यांनी केली आहे.