• December 26, 2022
  • No Comment

पुण्यात पुन्हा कोयता गॅंगची दहशत, भरवस्तीत दोघांवर जीवघेणा हल्ला

पुण्यात पुन्हा कोयता गॅंगची दहशत, भरवस्तीत दोघांवर जीवघेणा हल्ला

    पुणे: सध्या पुण्यातही अनेक तऱ्हेच्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढू लागलं आहे. पुण्यात कोयत्यानं हाणामारी करण्याच्या घटनाही दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी रोड रोमिया, गॅंग, टोळ्या आणि मवालीपणाच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे अशा परिसरात लोकांमध्ये भीतीचे आणि संतापाचा वातावरण वाढू लागले आहे. नुकतीच समोर आलेली घटना देखील हादरवून टाकणारी आहे.

    हडपसर, सिंहगड, खडकी या परिसरात कोयता गँगने दहशत पसरवण्याच्या घटना ताज्या असतानाच पुण्याच्या भरवस्तीत देखील असाच प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. सध्या या प्रकारानं पुणे हादरलं असून अशा टोळक्यांवर कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घोरपडे पेठेत 7 ते 8 जणांच्या टोळक्याने पाठलाग करून दोघांवर कोयत्याने वार केले. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकारानं नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *