• December 26, 2022
  • No Comment

कोयता गॅंगची दहशत! मध्यरात्री पेट्रोल पंपावर दरोडा; कोयत्याने कर्मचाऱ्यावर हल्ला

कोयता गॅंगची दहशत! मध्यरात्री पेट्रोल पंपावर दरोडा; कोयत्याने कर्मचाऱ्यावर हल्ला

    पुण्यातील कोयता गॅंगची दहशत वाढताना दिसत आहे. या गॅंगने पुणे जिल्ह्यातील वेळू ग्रामपंचायत हद्दीतील श्रीराम पेट्रोल पंपावर दरोडा टाकला. चोरांनी कोयत्याने मारहाण करुन 22 हजार रुपयांची रोख रक्कम लुटली आहे. या सगळ्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहेत. शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पाच अज्ञात व्यक्ती हातात दोन ते अडीच फूट लांबीचे धारदार कोयते घेऊन दोन काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरुन आले. त्यांनी सिक्युरिटी गार्डच्या हाताला पकडून कार्यालयात आणून रोख रकमेची मागणी केली. त्यांनी शिवीगाळ करत तीन कामगारांना आणि सुरक्षारक्षकाला कोयत्याने मारहाण केली. पेट्रोल पंपाच्या मालकाने या प्रकाराची पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार भोर पोलीस ठाण्यात अज्ञात पाच आरोपींविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *