• December 26, 2022
  • No Comment

हडपसर साडेसतरानळी येथे गाडी हळू चालव बाळा म्हटल्याच्या रागातून एका वकिलावर धारधार शस्त्राने वार

हडपसर साडेसतरानळी येथे गाडी हळू चालव बाळा म्हटल्याच्या रागातून एका वकिलावर धारधार शस्त्राने वार

    हडपसर : गाडी हळू चालव बाळा म्हटल्याच्या रागातून
    एका वकिलावर चौघांनी मारहाण करून धारधार
    शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना हडपसर
    जवळील साडेसतरा नळी परिसरात घडली आहे.
    ऍड. अभिजीत पांडूरंग वाळूंज असे हल्ला झालेल्या
    वकिलाचे नाव आहे. वाळूंज यांनी दिलेल्या तक्रारीनुसार
    हडपसर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
    करण्यात आला आहे.


    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऍड. अभिजीत वाळूंज
    हे चारचाकीतून शिवाजीनगर कोर्टातून घरी परत येत
    होते. परत येताना गाडी समोर वेगाने येणाऱ्या इसमाला
    ‘गाडी हळू चालव बाळा’ म्हणाले. यावेळी सदर इसमाला
    बाळ म्हणल्याचा राग आल्याने आरोपीने अभिजीत
    वाळूंज यांच्याबरोबर वादावादी झाली व आरोपीने बघून
    घेतो असा दम देऊन निघून गेला.

    दरम्यान, काही वेळा नंतर आरोपीने इतर तिघांना
    बोलावून घेऊन फिर्यादी वकील यांच्या घराबाहेर
    शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी वकील
    घराबाहेर पडताच चौघा आरोपींनी हल्ला चढवला.
    यावेळी एकाने धारधार शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न
    केला असता वाळूंज यांनी हा वार हाताने थांबवल्याने
    हातास गंभीर इजा झाली आहे. आरोपी हे मारहाण करून
    घटनास्थळावरून पळून गेले असून पोलिसांनी चौघांवर
    गुन्हा दाखल केला आहे. तपास हडपसर पोलीस करीत
    आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *