• January 1, 2023
  • No Comment

दोन लाख रुपायांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गजाआड

दोन लाख रुपायांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गजाआड

     

    पिंपरी: आरोपी न बनवण्याच्या बोलीवर दोन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी आज (दि.30) गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

    रोहित गणेश डोळस. (वय 31) असे अटक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांच्या भावाला आरोपी न करणे, तसेच अर्ज दिवाणी बाब म्हणून फाईल करण्याच्या बदल्यात डोळस यानी तक्रारदार व त्यांचे भावाकडे सुरुवातीला तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने डोळस यांना अटक केली आहे.

    पोलिस अधीक्षक अमोल तांबे अप्पर अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भारत साळुंखे, संदीप वर्‍हाडे, पोलिस हवालदार मुकुंद अयाचीत, पोलिस कर्मचारी भूषण ठाकूर आणि चालक एएसआय जाधव यांनी पडताळणी करून गुन्हा दाखल केला आहे.

    गुन्ह्याचा पुढील तपास एसीबी पुणेचे अधिकारी करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *