- January 3, 2023
- No Comment
पोलीस शिपाई चालक संवर्गातील रिक्त पदे भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे
मा. पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील
आदेशास अनुसरुन पोलीस आयुक्त, पुणे शहर आस्थापनेवरील पोलीस शिपाई व पोलीस शिपाई
चालक संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता दि.०३/०१/२०२३ पासून पोलीस मुख्यालय,
शिवाजीनगर, पुणे येथे भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
सदर भरतीसाठी येणाया उमेदवारांना आवाहन करण्यात येते की, सदरची भरती प्रक्रिया
ही मा. श्री रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली व श्री संदीप कर्णिक,
पोलीस सह आयुक्त, पुणे शहर यांचे अध्यक्षतेखाली पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पाडली जात
आहे. त्यामुळे भरतीसाठी कोणाच्याही प्रलोभनाला बळी पडू नये. जर कोणी व्यक्ती भरती करुन
देणेबाबत अमिष दाखवत असेल तर अशा व्यक्तींच्या भूलथापांना बळी न पडता सदर व्यक्तींबाबत
खालील नमूद दक्षता अधिकारी (व्हीजिलन्स ऑफिसर) यांना संपर्क साधून कळवावे. संबंधीत
व्यक्तींचे विरुध्द योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन पोलीस आयुक्त, पुणे
शहर यांचे मार्फत करण्यात येत आहे.
पोलीस आयुक्त, पुणे शहर आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक व पोलीस शिपाई
संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता प्रथम पोलीस शिपाई चालक यांची भरती प्रक्रिया दि.
०३/०१/२०२३ पासून सुरु करण्यात आली असून सदरची प्रक्रिया ही दि. १७/०१/२०२३ पर्यंत
चालणार आहे. तद्नंतर पोलीस शिपाई संवर्गाची भरती प्रक्रिया दि. १८/०१/२०२३ पासून सुरु
होईल.
सर्व उमेदवार यांनी त्यांना MAHA-IT यांचेकडून ऑनलाईन अदा करण्यात आलेल्या
प्रवेशपत्रावरील नमुद सुचनांचे पालन करुन दिलेल्या तारखेस भरती प्रक्रियेसाठी उपस्थित रहावे.
उमेदवारांस देण्यात आलेल्या तारखेस उमेदवार भरती प्रक्रियेसाठी उपस्थित राहू शकला नाही
तर त्यास कोणत्याही परिस्थितीत तारीख बदलून दिली जाणार नाही अथवा संधी उपलब्ध करुन
दिली जाणार नाही.
तसेच उमेदवार यांनी भरती प्रक्रियेसाठी येत असताना आवेदन अर्जाच्या व आवश्यक त्या
सर्व कागदपत्रांच्या छायांकीत / साक्षांकीत प्रतींचे २ सेट (संच) सोबत ठेवावेत.
दक्षता अधिकरी (व्हीजिलन्स ऑफिसरचे नांव)
श्री. रंजन कुमार शर्मा,७०२०६९२७९७
अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर.
श्री. आर. राजा.९४९०७७६९२८
पोलीस उप-आयुक्त, विशेष शाखा, पुणे शहर.
श्री. संदिपसिंह गिल्ल,८२८९००५१३३
पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – १, पुणे शहर