पुण्यातील वाघोली, केसनंद, विमाननगर परिसरात दहशत पसरवणारे गुंड तडीपार

    पुण्यातील वाघोली , केसनंद , विमाननगर परिसरात दहशत पसरवणाऱ्या दोन गुंडांना पुणे शहरातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी या दोघांच्या तडीपारीचे आदेश दिले आहेत. सत्यवान उर्फ अप्पा श्रीमंत घाडगे वय 24, आकाश अशोक राठोड वय 22, दोघे रा. गोरे वस्ती, वाघोली अशी तडीपार करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत.

    घाडगे आणि रोठोड यांच्या विरोधात बेकायदा शस्त्र बाळगणे, लूटमार करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींची या परिसरात दहशत असल्याने त्यांच्या विरुद्ध तक्रार करण्यास कोणीच पुढे येत नव्हते. त्यांना तडीपार करण्याचा प्रस्ताव लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांना दिला. त्यानुसार अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांनी तडीपारीचा प्रस्ताव मंजूर केला.


    अपर पोलिसांनी प्रस्तावाला मंजूरी दिल्यानंतर दोघांना पुणे शहर, जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले. ही कारवाई पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक आयुक्त किशोर जाधव लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत टेमगिरे , पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडु यांच्या पथकाने केली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *