• January 4, 2023
  • No Comment

बंगल्यातील जलतरण तलावात बुडून युवकाचा मृत्यू

बंगल्यातील जलतरण तलावात बुडून युवकाचा मृत्यू

    लोणावळा : लोणावळा शहरात खासगी बंगल्यातील जलतरण तलावात बुडून पर्यटकांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. खंडाळा भागातील एका बंगल्यातील जलतरण तलावात बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

    निखिल संपत निकम (वय २२, रा. चिंचवड) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. लोणावळ्यात मंगळवारी (३ जानेवारी) निखिल आणि त्याचे मित्र वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. निखिलच्या मित्राचा मंगळवारी वाढदिवस होता. त्यांनी खंडाळा भागातील एक बंगला भाडेतत्वावर घेतला होता. मंगळवारी रात्री निखिल बंगल्यातील जलतरण तलावात उतरला. पोहताना ताे बुडाला. निखिल बुडाल्याचे लक्षात आल्यानंतर मित्रांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *