• January 4, 2023
  • No Comment

विजेचा धक्का लागून एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

विजेचा धक्का लागून एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

    इंदापूर शहरामध्ये विजेचा धक्का लागून एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इंदापूर शहरातील अंबिकानगर भागात स्वतःच्या घराच्या बांधकामाला पाणी देण्यासाठी हा मुलगा गेला होता आणि याच दरम्यान त्यास विजेचा झटका लागला. त्यात त्याचा मृत्यू झाला. राजवर्धन रविंद्र रजपुत असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारच्या दरम्यान घडली आहे.

    या संदर्भात चर्तुसिंग बाबुसिंग रजपुत यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रजपूत यांच्या नवीन घराचे बांधकाम अंबिकानगर, ४० फुटी रोड येथे सुरु असून त्या बांधकामास पाणी देण्यासाठी राजवर्धन गेला होता. दरम्यान पाण्याच्या नळाला मोटार जोडत असताना राजवर्धन याला विजेचा झटका लागला आणि तो बेशुद्ध पडला. लागलीच त्याला शहरातील खाजगी रुग्णालयात उचारासाठी दाखल केले; मात्र डाॅक्टरांनी त्यास मृत घोषीत केले असं फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास इंदापूर पोलिस करित आहेत.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *