- January 4, 2023
- No Comment
जुगार अड्डयावर छापा टाकुन २६ इसमावर कारवाई करून ०१,०३,९१०/- रू. चा मुद्देमाल जप्त.
मुंढवा पुणे परीसरात पत्र्याच्या शेडमध्ये काही
इसम बेकायदेशीरपणे जुगार खेळत व खेळवत असलेबाबत, प्राप्त झालेल्या
बातमीदार मार्फतीने खात्रीशीर बातमी मिळाली कि.
सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व
पोलीस अमंलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता, काही
इसम बेकायदेशीर पैसे लावुन जुगार खेळत व खेळवत असल्याचे मिळुन
आल्याने २५ इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे कडून रोख रक्कम, मोबाईल व
जुगाराचे साहित्य असा एकुण ०१,०३,९१०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात
आला.
सदर प्रकरणी जुगार खेळताना मिळुन आलेले इसम व एक पाहिजे
आरोपी अशा २६ इसमांविरूध्द मुंढवा पोलीस स्टेशन येथे गुरनं. ०४ / २०२३,
महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ ( अ ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात
आला असुन,त्यांना पुढील कारवाई करीता मुंढवा पोलीस स्टेशनच्या ताब्यात
देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा.
पोलीस सह आयुक्त, श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे,
श्री.रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे यांचे मार्गदर्शना
खाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच
सपोनि.अश्विनी पाटील, सपोनि. अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, अजय राणे,
आण्णा माने, पुष्पेंद्र चव्हाण, संदीप कोळगे व अमित जमदाडे या पथकाने
यशस्वी केली आहे.