- January 4, 2023
- No Comment
हत्यारासह दहशत माजविणारे फरार आरोपी अखेर हत्यारासहीत अटक
नावावाडा नाना पेठ पुणे येथे इसम नामे कुणाल रावळ, गगन
मिशन, स्वप्नील शिंदे, सुजल टापरे, अमन पठाण, आरसन तांबोळी, मयुर थोरात, मंगेश चव्हाण व
इतर यांनी बेकायदेशीर जमाव जमवून हातामध्ये कोयते, पालघण सारखी हत्यारे घेवून मोटार
सायकलवरून येवून त्यांचेकडील हत्यारे हवेत फिरवत दहशत माजवली होती. सदरबाबत समर्थ
पोलीस ठाणे ०१/२०२३ भादवि कलम १४३, १४७, १४८, १४९,५०४, ५०६ (२), आर्म अॅक्ट ४ (२५),
मपोॲक्ट ३७(१)(३)१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपी नामे
१)गगनदीप मिशन २ ) अमन खान दोघे रा. नानापेठ, पुणे ३)
अरसलन तांबोळी, ४) मंगेश चव्हाण
५)गणेश पवार,तिघे रा. रविवार पेठ, पुणे यांना यापुर्वीच समर्थ पोलीस ठाणेकडील पोलीसांनी अटक
केली आहे.
यातील पाहीजे आरोपींचा समांतर तपास चालु असताना पोलीस अंमलदार अजय थोरात
व निलेश साबळे यांना त्यांच्या बामतीदाराकडून बातमी मिळाली की, दाखल गुन्हयातील पाहिजे
आरोपी नामे १)मयुर थोरात २) सुजल टापरे व त्यांचा एक साथीदार हे त्यांची अटक
चुकवीण्यासाठी नारायण पेठेतील ओंकारेश्वर मंदीराचे मागील नदी पात्रातील धोबी घाटालगत
लपुन बसले असून, त्यांचेकडे हत्यारे आहेत अशी बातमी प्राप्त झाल्याने युनिट-१ चे प्रभारी
अधिकारी मा.पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शना प्रमाणे आरोपी
नामे १) मयुर दत्तात्रय थोरात, वय – २३ वर्ष, रा. २३ नानापेठ, डोके तालिम जवळ, पुणे २) सुजल
राजेश टापरे,वय-१९ वर्ष, रा. ११, नाना पेठ, डोके तालिम मागे, पुणे व एक विधीसंघत बालक यास
नारायण पेठेतील ओंकारेश्वर मंदीराचे मागील नदीपात्रातून त्यांचेकडील २,२००/- रू किचे
त्यामध्ये पालघन, कोयता व सु-यासह ताब्यात घेवून त्यांचेकडे अधिक तपास करता, त्यांनी वरील
गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपी व विधिसंर्षीत बालकास पुढील कारवाईसाठी समर्थ पोलीस
ठाणेकडील पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त,
श्री.संदीप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप-आयुक्त,
गुन्हे,श्री.अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, श्री. गजानन टोम्पे पुणे यांच्या मार्गदर्शना
खाली युनिट-१ कडील पोलीस निरीक्षक, संदीप भोसले, पोउपनिरी सुनिल कुलकर्णी, पोलीस
अंमलदार, अजय थोरात, निलेश साबळे, दत्ता सोनवणे, विठ्ठल साळुंखे, तुषार माळवदकर, महीला
पोलीस अंमलदार, रूक्साना नदाफ यांनी केली आहे.