• January 5, 2023
  • No Comment

१ वर्षापासून फरारी असलेला रेकॉर्ड वरिल गुन्हेगार जेरबंद करुन दरोडा, जबरी चोरी, वाहन चोरी व इतर चोरीचे गुन्हे उघडकीस

१ वर्षापासून फरारी असलेला रेकॉर्ड वरिल गुन्हेगार जेरबंद करुन दरोडा, जबरी चोरी, वाहन चोरी व इतर चोरीचे गुन्हे उघडकीस

    हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. १५६२/२०२२, भा. द. वि. कलम ३७९, ३४ या गुन्हयाचा तपास वरिष्ठांचे
    मार्गदर्शनाखाली युनिट-६ चे अधिकारी व अंमलदार करित असताना दिनांक ३१/१२/२०२२ रोजी गुन्हे शाखा, युनिट
    ६ कडील पोलीस अंमलदार नितिन मुंडे यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा रेकॉर्ड
    वरिल गुन्हेगार राहूलसिंग भोंड याने केलेला असून तो गंगानगर कॅनॉल शेजारी असलेले मोकळे मैदानात हडपसर
    पुणे येथे थांबलेला असुन त्याचे ताब्यातील गाडी ही चोरीची आहे. सदरची माहिती श्री रजनिश निर्मल, वरिष्ठ पोलीस
    निरीक्षक,गुन्हे शाखा,युनिट-६, पुणे शहर यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून राहुलसिंग रविंद्रसिंग भोंड, वय १८ वर्ष, रा. कॅनॉल शेजारी, तुळजा भवानी वसाहत, हडपसर, पुणे

    यास त्याच्या
    ताब्यातील मोटार सायकलसह ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील मोटार सायकलबाबत तपास करता सदरची मोटार
    सायकल ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने मोटार सायकल जप्त करुन नमूद आरोपीस गुन्हयात अटक करून
    त्याची पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात आली. पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान आरोपीकडून ०३ मोटार सायकली,
    ०३ मोबाईल हॅन्डसेट, रोख रक्कम, गुन्हयात वापरलेले हत्यार असा एकूण १,२२,४०० /- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत
    करण्यात आला असून,त्यामध्ये नमूद गुन्हयासोबतच १ दरोडयाचा गुन्हा, ३ जबरी चोरीचे, ३ वाहन चोरीचे गुन्हे
    उघडकीस आले असून त्याचे साथीदार कैफ मुनाजीर अन्सारी यास गुन्हयात अटक करण्यात आली आहे. इतर
    आरोपींचा शोध घेत आहोत. अटक आरोपीकडून खालील गुन्हे उघडकीस आले.
    १) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं.१६/२०२३ भा.दं.वि. कलम ३९५, ३०७,५०४,५०६ आर्म
    अॅक्ट कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५
    २) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. ०६/२०२३ भा.दं.वि. कलम ३९२, ३४
    ३) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं.१६२१/२०२२ भा.दं.वि. कलम ३९४,५०४, ३४
    ४) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. १६८९/२०२२ भा.दं.वि. कलम ३९२, ३४
    ५) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. १६८१/२०२३ भा.दं.वि. कलम ३७९
    ६) चतुश्रृंगी पोलीस स्टेशन गु.र.नं. ४२८ / २०२२ भा.दं.वि.कलम ३७९
    ७) कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं. १२९४/२०२२ भा.दं.वि. कलम ३७९
    ८) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. १५६२/२०२३ भा.दं.वि. कलम ३७९
    आरोपी राहुलसिंग रविंद्रसिंग भोंड हा खडकी पो.स्टे कडील १ गुन्हयात, हडपसर पो.स्टे कडील २
    भोसरी पो.स्टे कडील १ गुन्हयात व कोंढवा पो.स्टे कडील १ गुन्हयात पाहिजे आरोपी आहे.
    गुन्हयात,
    सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त श्री रितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक,
    मा. अपर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे
    शाखा, पुणे शहर, श्री. नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट-६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री
    रजनिश निर्मल, पोलीस उपनिरीक्षक, सुरेश जायभाय, पोलीस उप-निरीक्षक, भैरवनाथ शेळके, पोलीस अंमलदार, नितीन
    मुंडे, बाळासाहेब सकटे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश टिळेकर, मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, प्रतिक लाहिगुडे,
    रमेश मेमाणे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, नितीन धाडगे, अशफाक मुलाणी, सुहास तांबेकर
    व ज्योती काळे यांचे पथकाने केली आहे.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *