• January 5, 2023
  • No Comment

मंदिरातील दानपेटी घेऊन चोरटे फरार, तळेगाव दाभाडे येथील घटना

मंदिरातील दानपेटी घेऊन चोरटे फरार, तळेगाव दाभाडे येथील घटना

    पुणे : पुण्याच्या तळेगाव दाभाडे येथे दुर्गामाता मंदिरात अज्ञात दोन चोरट्यांनी दानपेटी पळवली. चोरट्यांनी काही अंतरावर जाऊन दानपेटी फोडून त्यातील पैसे घेऊन पसार झाले हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करत आहेत. ही घटना दोन दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास घडली आहे.


    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथे दुर्गा मंदिर असून पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. मंदिरात आणि परिसरात कोणीही नसल्याची खात्री केली. अवघ्या तीस सेकंदात अज्ञात दोघांनी मंदिरातील दान पेटी पळवून काही अंतरावर ती फोडली आणि त्यातील पैसे घेऊन पसार झाले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करत आहेत. दानपेटीत किती पैसे होते हे अद्याप समजू शकले नाही. मंदिरात चोरी झाल्याने सर्वसामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *