• January 6, 2023
  • No Comment

मौजमजेसाठी वाहन चोरी करणा-या आरोपीकंडुन ७ दुचाकी गाडया व १ रिक्षा जप्त.

मौजमजेसाठी वाहन चोरी करणा-या आरोपीकंडुन ७ दुचाकी गाडया व १ रिक्षा जप्त.

    भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांचे मार्गदर्शनाखाली
    भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार, अभिजीत
    जाधव, राहुल तांबे, निलेश ढमढेरे असे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत सातारा
    रोडवरील कदम प्लाझा समोरील रोडवर आले असताना, इसम नामे राजेश प्रकाश परळकर, वय – ३०
    वर्षे,रा.लक्ष्मी अपार्टमेंन्ट, सर्वे नं. १७, लेन नं. ७, सुखसागरनगर, कात्रज, पुणे हा त्याचे ताब्यात रिक्षा
    क्रमांक MH12NW9102 मिळुन आल्याने, त्याचेकडे सदर रिक्षाबाबत तपास करता ती गाडी भारती
    विद्यापीठ पोलीस स्टेशन गुरंनं. ८१८ / २०२२ भादंवि कलम ३७९ या गुन्हयामधील चोरीची असल्याचे
    निष्पन्न झाल्याने सदरची रिक्षा जप्त करुन नमुद आरोपीस गुन्हयात अटक केली आहे. अटके दरम्यान


    आरोपीकडे तपास करता त्याने आणखीन ०७ दुचाकी गाडया निवेदन पंचनाम्याने काढुन दिल्याने ती
    वाहने जप्त करण्यात आल्या आहेत.
    भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाने खालील प्रमाणे एकुण ०७ वाहन चोरीचे
    गुन्हे उघडकीस आणले आहेत.

    भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे गुन्हा रजि ८१८ / २०२२ भादंवि कलम ३७९ प्रमाणे
    भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे गुन्हा रजि ०९ / २०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे
    भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे गुन्हा रजि ०६ / २०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे
    सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे गुन्हा रजि ०१ / २०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे
    हडपसर पोलीस स्टेशन, पुणे गुन्हा रजि २५ / २०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे
    मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, पुणे गुन्हा रजि ५६ / २०१८ भादंवि कलम ३७९ प्रमाणे
    जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण गुन्हा रजि १४१ / २०२२ भादंवि कलम ३७९ प्रमाणे
    वरील प्रमाणे आरोपीताकडुन ०७ दुचाकी गाडया व एक तीन चाकी रिक्षा अशी एकुण ०८
    वाहने त्यांची एकुण किंमत ४,५०,०००/- रुपयेचा मुद्देमाल गुन्हया मध्ये हस्तगत करण्यात आला आहे.


    सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२, श्रीमती. स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस
    आयुक्त, स्वारगेट विभाग, श्रीमती सुषमा चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशन
    कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट तसेच पोलीस निरीक्षक, (गुन्हे), विजय पुराणिक,
    सहा. पोलीस निरीक्षक, अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार अभिजीत
    जाधव, राहुल तांबे, निलेश ढमढेरे, सचिन सरपाले, शैलेश साठे, विश्वनाथ गोणे, चेतन गोरे, मंगेश
    पवार, हर्षल शिंदे, अवधुत जमदाडे, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, मितेश चोरमोले,
    अभिनय चौधरी, विक्रम सावंत व अशिष गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *