• January 7, 2023
  • No Comment

परभणीहुन आठ दिवसापुर्वी मित्राचा खुन करुन फरार असलेले तिघेजन लोणी काळभोर पोलिसांच्या जाळ्यात

परभणीहुन आठ दिवसापुर्वी मित्राचा खुन करुन फरार असलेले तिघेजन लोणी काळभोर पोलिसांच्या जाळ्यात

    लोणी काळभोर :- परभणीहुन आठ दिवसापुर्वी मित्राचा खुन करुन फरार असलेले तिघेजन लोणी काळभोर पोलिसांच्या कार्यतप्तरतेमुळे पोलीसांच्या जाळ्यात अडकली आहे.

    लोणी काळभोर रेल्वे स्थानकात तीन जण खुनाबाबत चर्चा
    करत असल्याची माहिती खबऱ्या मार्फत पोलिस हवालदार

    नितीन गायकवाड व शैलेश कुदळे यांना मिळताच त्यांनी व पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे  यांनी कार्यतत्परता

    दाखवत रेल्वे स्थानकावर जाऊन चर्चा करणाऱ्या तीनही
    जणांना ताब्यात घेतल्याने, खुनासारख्या गंभीर गुन्हातील
    आरोपी पोलीसांच्या हाती लागले.आदित्य इस्माईल शेख, मोहम्मद मुजाइद सिद्धीकी व नयुम चाँद शेख (रा. तिघेही करंजी ता. वसमत जि हिंगोली) ही त्या तीन आरोपींची नावे असुन, वरील तिघे शाहरुख शुभम शेख या मित्राचा आठ दिवसापुर्वी खुन करुन पसार झाले होते. दरम्यान लोणी काळभोर पोलिसांनी वरील तीनही आरोपींना

    अटक करुन, पुढील कायदेशीर कारवाईसाठी हिंगोली

    जिल्हातील पुर्णा पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

    लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, गुरुवारी

    (दि. ५) रात्री अकरा वाजनेच्या सुमारास लोणी काळभोर रेल्वे स्थानकावर तीन तरुण एका खुनाबाबत चर्चा करत

    असल्याची माहिती, एका खबऱ्याने पोलिस हवालदार नितीन

    गायकवाड यांना दिली. ही माहिती मिळताच

    पोलिस उपनिरीक्षक अमित गोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ लोणी स्टेशनला जाऊन, माहिती घेण्यास सुरुवात केली. यावेळी रेल्वे स्थानकाच्या एका कोपऱ्यात तीनजण चोरुन बसल्याचे आढळुन आले. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, तिघेही घाबरल्याचे आढळुन आले. त्यां तिघांना घेऊन पोलिस ठाण्यात आणून विचारपुस केली असता तिघांनी केलेल्या गुन्हाची माहिती पोलिसांना दिली. यावर वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी पुर्णा पोलीस स्टेशनला फोन केला व संबधित पोलिस ठाण्याच्या आधिकाऱ्यांशी वरील गुन्हाबाबत चर्चा केली असता, आदित्य इस्माईल शेख, मोहम्मद मुजाइद सिद्धीकी व नयुम चाँद शेख देत असलेल्या गुन्हाची माहिती खरी निघाली. पोलिस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलिस हवालदार नितीन गायकवाड व शैलेश कुदळे यांनी कार्यतत्परता दाखवत पळापळ केल्याने, खुना सारख्या गंभीर गुन्हातील आरोपी पोलिसांच्या हाती लागले.वरील उल्लेखनीय कामगीरी पोलिस आयुक्त रितेश कुमार,

    सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप कर्णीक, अप्पर पोलीस

    आयुक्त रंजन शर्मा उपायुक्त विक्रांत देशमुख, बजरंग देसाई, वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण सुभाष काळे (पोलीस निरीक्षक (गुन्हे)) यांच्या मार्गदर्शनाखाली अमित

    गोरे, पोलीस अंमलदार नितीन गायकवाड, पाटोळे, नागलोत,

    जाधव, देवीकर, पुंडे, वीर, शैलेश कुदळे, पवार, सोनवणे यांच्या पथकाने केली आहे..

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *