• January 7, 2023
  • No Comment

रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराकडुन एक गावठी बनावटीचे पिस्टल व २ काडतुसे जप्त

रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराकडुन एक गावठी बनावटीचे पिस्टल व २ काडतुसे जप्त

    वानवडी पोलीस ठाणेकडील तपास पथकातील स्टाफ वानवडी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग
    करीत असताना पोलीस हवालदार अमजद पठाण व संतोष नाईक यांना संयुक्तीकरित्या गोपनिय
    बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहीतीवरुन वानवडी पोलीस ठाणे कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे गुफ्या
    ऊर्फ गुफरान ऊर्फ मतीन खान, रा. गल्ली नं. १५ ए, गुलाबी बिल्डींग, सय्यदनगर, हडपसर, पुणे हा
    रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया येथे संशयितरित्या फिरताना मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवून त्याची
    अंगझडती घेतली असता, त्याचेकडे खालीलप्रमाणे वस्तु मिळुन आल्या.


    १) अंदाजे ४०,०००/- रु. किं. चे गावठी बनावटीचे पिस्टल
    २) अंदाजे ४,००/- रु. किं. ची दोन जिवंत काडतुसे
    ३) अंदाजे १०,०००/- रु. किं. चा मोबाईल हॅन्डसेट
    सदरचे पिस्टल व राऊंड हे त्याने कोणाचेही अधिकृत परवान्याशिवाय जवळ बाळगल्याने
    त्याचेवर वानवडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ०२ / २०२३ भारतीय शस्त्र अधि कलम ३ (२५), महाराष्ट्र
    पोलीस अधि कलम ३७ (१) सह १३५, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन त्यात त्याला अटक
    करण्यात आलेली आहे. नमुद अटक आरोपी याचेवर यापुर्वी चोरी, दरोडा, आर्म अॅक्ट या सारखे गुन्हे
    वानवडी पोलीस स्टेशन येथे दाखल आहेत. सदर गुन्हयाचा अधिक तपास हे पोलीस उपनिरिक्षक अजय
    भोसले हे स्वत: करीत आहेत.
    सदरची कारवाई ही श्री. रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पुर्व विभाग, पुणे शहर, श्री.
    विक्रांत देशमुख पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०५ पुणे शहर, श्रीमती पौर्णिमा तावरे, सहा. पोलीस
    आयुक्त वानवडी विभाग, पुणे शहर व संदिप शिवले अतिरीक्त कार्यभार वरीष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी
    पो. स्टे. पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, जयवंत जाधव,
    पोलीस उप निरिक्षक अजय भोसले व पोलीस अमंलदार अमजद पठाण, संतोष नाईक, विनोद भंडलकर,
    महेश गाढवे, राहुल गोसावी, निळकंठ राठोड यांनी केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *