• January 8, 2023
  • No Comment

सिंहगड महाविद्यालय परिसरात गुंडांना चोप देणाऱ्या पोलिसांना पोलीस आयुक्तांनी केला सत्कार आणि २५ हजारांचे बक्षीस जाहीर

सिंहगड महाविद्यालय परिसरात गुंडांना चोप देणाऱ्या पोलिसांना पोलीस आयुक्तांनी केला सत्कार आणि २५ हजारांचे  बक्षीस जाहीर

    पुणे : सिंहगड रस्त्यावरील खाऊ गल्लीत कोयते उगारुन दहशत माजविणाऱ्या सराइत गुन्हेगारांना चोप देणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोलीस आयुक्तांकडून पोलीस कर्मचारी अक्षय इंगवले आणि धनंजय पाटील यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची बक्षीस जाहीर केले आहे.

    सिंहगड महाविद्यालय परिसरातील खाऊ गल्लीत कोयते उगारुन दहशत माजविण्याची घटना नुकतीच घडली. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अक्षय इंगवले आणि धनंजय पाटील त्या वेळी गस्त घालत होते. सराईत गुन्हेगारांंनी कोयते उगारुन खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्यांची तोडफोड केली. खाऊ गल्लीतील हाॅटेलमध्ये शिरुन दहशत माजविली. वाहनचालक तसेच नागरिकांवर कोयते उगारले होते. त्यांनी एका तरुणावर कोयत्याने वार केला. या घटनेची माहिती मिळताच गस्त घालणारे पोलीस कर्मचारी इंगवले आणि पाटील यांनी सराइतांना पाठलाग करुन पकडले. खाऊ गल्लीत त्यांना चोप दिल्याची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *