- January 8, 2023
- No Comment
न्यूझीलंडमध्ये नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवत उच्चशिक्षित व्यक्तीची फसवणूक
न्यूझीलंडमध्ये नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवत उच्चशिक्षित व्यक्तीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. मल्टी नॅशनल कंपनीमध्ये वरिष्ठ पद मिळवून देतो, असे सांगत 58 वर्षीय व्यक्तीची तब्बल 7 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी 58 वर्षीय व्यक्ती यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. ब्रोकस्टन विल्यम्स, ऑस्टिन इक्र, रिचर्ड अशा तीन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार मार्च 2022 ते एप्रिल 2022मध्ये घडला. ब्रोकस्टन विल्यम्स, ऑस्टिन इक्र आणि रिचर्ड यांनी तक्रारदाराला बेयर कॉर्पसायन्स व मिनिस्ट्री ऑफ बिझिनेस, इनोवेशन अँड एम्प्लॉयमेंट, न्यूझीलंड या कंपनीचे कर्मचारी असल्याचं सांगितलं. या कंपनीमध्ये वरिष्ठ पदासाठी नोकरी लावून देतो, असे त्यांना ई-मेल केले. इतकंच नाही तर कंपनीचे बनावट कागदपत्र, लेटर, व्हिजा देखील ईमेल केले होते. त्यांच्या या आमिषाला हे उच्चशिक्षित बळी पडले.