• January 8, 2023
  • No Comment

ऑनलाईन मैत्री करणं पडलं महागात; महिलेकडून तरुणाला लाखोंचा गंडा

ऑनलाईन मैत्री करणं पडलं महागात; महिलेकडून तरुणाला लाखोंचा गंडा

    फेसबुकवर अनोळखी महिलेशी मैत्री करणं मुंबईतील नोकरदार तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. कारण आता आरोपी महिलेनं तरुणाला ३.५ लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून त्यामुळं मुंबईतील चेंबूरमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पीडित तरुणानं तक्रार दाखल केली असून पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करण्याची कार्यवाही सुरू केली असून या प्रकरणात मुंबईत तरुणांची फसवणूक करणारं रॅकेट सक्रीय असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.


    मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईलगत असलेल्या ऐरोलीतील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाला गेल्या महिन्यात कीर्ती अग्रवाल नावाच्या महिलेची फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. त्यानं रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाली. एकमेकांनी व्हॉट्सअॅपचा नंबरही शेयर केला. तरुणानं महिलेशी काही दिवस फोनवर बोलणं देखील केलं. परंतु ३१ डिसेंबरला नववर्षाच्या निमित्तानं आनंदोत्सव साजरा करत असताना तरुणाला आरोपी महिलेनं फोन करून बाथरुममध्ये जाण्याची विनंती केली. त्यानंतर बाथरुममध्ये जाण्याची विनंती केली. तरुण बाथरुममध्ये गेल्यानंतर त्यानं कपडे काढले. त्यावेळी त्याला व्हिडिओ कॉलवर विवस्त्र महिलेचा व्हिडिओ दिसला. काही सेकंदांनंतर कॉल डिस्कनेक्ट झाला आणि त्यानंतर आरोपी महिलेनं तरुणाला फोन करून कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. याशिवाय पहिल्यावेळी १५ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर आरोपींना फोटो व्हायरल होण्याच्या भीतीनं पैसे दिल्याचंही तरुणानं तक्रारीत म्हटलं आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *