• January 8, 2023
  • No Comment

भीक मागण्याच्या बहाण्याने मोटारचालकाकडील रोकड हिसकावून नेणाऱ्याला पोलिसांनी पकडले

भीक मागण्याच्या बहाण्याने मोटारचालकाकडील रोकड हिसकावून नेणाऱ्याला पोलिसांनी पकडले

    पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ चौकात भीक मागण्याच्या बहाण्याने मोटारचालकाकडील रोकड हिसकावून नेणाऱ्याला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. एकनाथ मारुती सावंत (वय ३५, रा. वैदुवाडी हडपसर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
    प्रादेशिक परिवहन कार्यालय चौकातील सिग्नलावर सावंत भीक मागत होता. त्यावेळी एका मोटारचालकाने त्याला दहा रुपये दिले. सावंत याने त्याच्या हातातील ५०० रुपयांची नोट हिसकावून पळ काढला. मोटारचालकाने मदतीसाठी आरडाओरडा केला. सिग्नलवर थांबलेल्या पोलिसांनी पाठलाग करून सावंत याला संगम घाट परिसरात पकडले. सावंत व्यसनाधीन आहे. व्यसनासाठी तो चोऱ्या करत असल्याचे प्राथमिक ढतपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस उपनिरीक्षक गोरड तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *