- February 25, 2023
- No Comment
कॉलेजमध्ये अॅडमिशन करुन देण्याच्या बहाण्याने गुंगीचे औषध देऊन तरुणीवर बलात्कार
पुणे : महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. ही घटना भांडारकर रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये घडली. तसेच तरुणीचे छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसार करण्याची धमकी देत तिच्याकडून एक लाख ३८ हजार रुपये उकळले. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी सुमित बाळासाहेब जेधे वय २६, रा. संगमवाडी, येरवडा या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत एका अल्पवयीन मुलीने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी जेधे याच्याशी तिची वर्षभरापूर्वी ओळख झालेली. महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिला जाळ्यात ओढले. डेक्कन भागातील एका हॉटेलमध्ये नेत शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला. मोबाइलवर छायाचित्र काढून ते समाजमाध्यमावर व्हायरल करण्याची धमकी दिली. एक लाख ३८ हजार रुपये घेतले. अखेर घाबरलेल्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक कल्याणी पाडोळे तपास करत आहेत.