- February 25, 2023
- No Comment
ससूनमध्ये दोन गँग एकमेकांशी भिडल्या; कोयता व चाकूने हाणामारी
पुणे : हडपसर भागातील गुन्हेगारी टोळ्यांनी एकमेकांवर कोयता आणि चाकूने वार केला. ही घटना शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास ससूनच्या आवारात घडली. यात तीन ते चारजण जखमी झाले.
अधिक माहितीनुसार, रामटेकडी परिसरातील हे दोन्ही गट तक्रार देण्यासाठी हडपसर ठाण्यात आले होते. आरोपींना तेथून वैद्यकीय तपासणी आणि उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठवले होते. एक सहायक पोलिस उपनिरीक्षक आणि इतर हडपसर पोलिस ठाण्याचे कर्मचारी होते.
बाह्यरुग्ण उपचार कक्षाच्या बाहेर दोन टोळ्यांमधील सराईत समारोसमोर आले. त्यांच्या साथीदारांनी एकमेकांना शिवीगाळ करून कोयते उगारून दहशत पसरवली. सुरक्षारक्षक आणि हडपसर पोलिसांच्या पथकाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोन टोळ्यांमधील सराईतांना ताब्यात घेतले. बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.