• February 27, 2023
  • No Comment

पूर्ववैमनस्यातून मोक्कातील गुन्हेगारचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून

पूर्ववैमनस्यातून मोक्कातील गुन्हेगारचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून

    पुणे : पूर्ववैमनस्यातून मोक्कातील गुन्हेगार नंदू जाधव (वय २२, रा. लक्ष्मीनगर) याचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केला. ही घटना कर्वेनगरमध्ये रात्री साडेनऊ वाजता घडली. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नाेंदवला आहे.

    अधिक माहितीनुसार, नंदू जाधव याच्यावर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात मोक्काखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला नुकताच जामीन मिळाल्याने तो बाहेर आला होता; नंदू जाधव हा गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गांधी भवन येथील पीएनजी ज्वेलर्स येथून जात असताना त्याला गुंडांनी गाठले. त्याच्या डोक्यात धारदार शस्त्रांनी वार केले. त्यात तो जबर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्याचा मृत्यू झाला.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *