• February 27, 2023
  • No Comment

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

    पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करणाऱ्या व नंतर ती गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित डॉक्टरने तरुणीकडून साठ हजार रुपये उसने घेत तिची फसवणूक केली आहे. ही घटना सप्टेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान घडली.

    डॉ. अंकुश गुंड (रा. गणेश व्हिला, आंबेगाव) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी २६ वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीचे वडील आजारी असताना वडिलांचे रिपोर्ट दाखविण्यासाठी ती डॉक्टरांकडे गेली असता दोघांची ओळख झाली. या ओळखीतून फिर्यादी तरुणी आणि डॉ. अंकुश गुंड यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर तरुणी गर्भवती असताना डॉक्टरने तिला औषधी गोळ्या खायला देऊन गर्भपात केला. तिचा मोबाइल आणि साठ हजार रुपये घेऊन फसवणूक केली. त्यानंतर तरुणी पुन्हा गर्भवती असताना डॉ. अंकुश गुंडने तिला मारहाण केली. तसेच पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली.

    Related post

    सराईत गुन्हेगार तडीपार आदेश झालेला आरोपी लाल्या उर्फ मयुर गुंजाळ यास जिल्हा व सत्र न्यायालय यांच्याकडून अटकपूर्व जामीन मंजूर

    सराईत गुन्हेगार तडीपार आदेश झालेला आरोपी लाल्या उर्फ मयुर…

    पुणे :- येरवडा परिसरात दहशत माजवुन रात्रीच्या वेळेस बर्थ-डे केक भर चौकात सिंघम गाण्यावर कापला. सदररील बातमी प्रसिध्द झाल्यानंतर पोलीसांची कारवाई…
    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी त्याला मदत करणाऱ्या दलालाने केलेल्या १५ परवान्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी…

    पुणे : कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदे याने बनावट पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळविल्याचे उघडकीस आले. शस्त्र…
    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *